बोगस आधारकार्डव्दारे ‘RTE’ प्रवेश मिळवून देणार्‍या पुण्यातील टोळीचा पर्दाफाश, ५ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात सर्वात विश्वासार्ह पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिले जाते. आधार कार्ड असले तर अन्य पुरावा मागितला जात नाही. इतका त्याच्यावर भरवसा ठेवला जातो. त्या आधारे अगदी पासपोर्टही दिला जातो. असा विश्वासार्ह असलेले आधार कार्डावरील पत्ता बदलून, बोगस तयार करुन तसेच अन्य कागदपत्रे बनावट बनवून त्याद्वारे दलित, वंचित मुलांसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचा फायदा देऊन इतर मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणारी टोळी हडपसर पोलिसांनी जेरबंद केली आहे.

हडपसर पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, दोन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कलर प्रिंटर, बनावट शिक्के तसेच अन्य बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.

दीपक विठ्ठल गरुड (वय ३६, रा. महादेवनगर, हडपसर), सचिन बहिरट (वय ३६, रा. माळवाडी, हडपसर), सुधीर अभिमन्यू काकडे (वय ३५, रा. माळवाडी, हडपसर), ऋषिकेश भानुदास इमाले (वय २८, रा. टाकवे खुर्द ता. मावळ) आणि अनिकेत सुरेश शिंदे (वय ३२, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ही टोळी शाळेत प्रवेशासाठी येणाऱ्या लोकांना हेरायची. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५० हजार ते १ लाख रुपये घेत. त्यांच्या व मुलाच्या नावाच्या आधार कार्डवरील पत्ता बदलून बनावट कार्ड तयार करीत. त्यानंतर त्यांचे उत्पन्न १ लाख रुपयांच्या खाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारत आणि ती आरटीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सादर करीत असत.

हडपसर येथील एका लॉजवर ही टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तेथे छापा घालून त्यांना पकडले.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या टोळीच्या कारस्थानाचा भंडाफोड केला असून आतापर्यंत त्यांनी जवळपास ५० मुलांना प्रवेश मिळवून दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. आता या टोळीमार्फत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश मिळविणाऱ्या मुलांचे प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे 

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक 

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव 

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय