टेनिसपटूचा ‘शर्टलेस’ फोटो काढताना ‘महिला’ झाली कॅमेरात ‘कैद’, त्यानंतर गावभर ‘चर्चा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूएस ओपनमध्ये मॅच दरम्यान टेनिस स्टार फेलिसियानो लोपेजच्या एका महिला चाहत्याचा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होते आहे. यामुळे ती महिला चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मॅच सुरु झाल्यानंतर फेलिसियानो लोपेज यांनी ब्रेकमध्ये आपला टी शर्ट बदलला, याच दरम्यान या महिलेने मोबाइल बाहेर काढून त्यात टेनिस स्टारचा शर्टलेस फोटो काढला.

व्हिडिओ व्हायरल –
हा फोटो काढताना व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. मॅच दरम्यान जास्त घाम आल्याने लोपेजला आपल्या शर्ट बदलावा लागला. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लोपेज जेव्हा टी शर्ट बदलत होता. त्यादरम्यान ही महिला आपल्या फोनमध्ये त्याचा फोटो काढत होती.

टेनिस स्टारचा हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मिडियावर लोकांची त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या. यावर ऑस्ट्रेलियाचे टेनिस खेळाडू रीड आणि थानासी कोकिनकिस यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ज्यामुळे यावर चर्चा आणखी रंगली.

या मॅचमध्ये लोपेजला प्रतिस्पर्धी टेलर फ्रिट्जकडून हार पत्करावी लागली. टेलर ने लोपेज ला 3-6, 6-4, 6-3, 6-4 ने हरवले . यामुळे आता लोपेज यूएस ओपनमधून बाहेर झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –