धावत्या रेल्वेमधून पडून महिला पोलिसाचा मृत्यू, 9 फेब्रुवारीला होतं लग्न, कुटूंबियांवर शोककळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युपी पोलीसदलामध्ये कार्यरत असलेली सुन्हैडा गावातील निवासी महिला कॉन्स्टेबलचा शनिवारी चालू ट्रेनमधून पडल्याने मृत्यू झाला. सुन्हैडा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. घटनेबाबत घरच्यांना माहिती मिळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

2013 मध्ये 26 वर्षीय रितू पोलीस सेवेमध्ये कॉन्स्टेबल पदावर भरती झाली होती. शनिवारी ती दिल्लीहून आपल्या गावाला रेल्वेने चालली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू रेल्ववेमधून ती खाली पडली. प्रवाश्यांनी यावेळी चेन ओढून चालकाला याबाबत माहिती दिली. कुटुंबियांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र रुग्णालयात रितूचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

9 फ्रब्रुवारीला होते लग्न –
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रितूचे लग्न जवळच्याच मंसूरपुर गावामध्ये निश्चित करण्यात आले होते. नऊ फेब्रुवारी रोजी हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र अचानक झालेल्या अपघातामुळे कुटुंबीय दुःखात बुडाले आहेत.