धक्कादायक ! धमकी देत महिला क्रिकेटपटूवर प्रशिक्षकने केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली येथील एका महिला क्रिकेटपटूनं प्रशिक्षकाने करिअर उद्धवस्त करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या महिला क्रिकेटपटूनं ट्विट करत भाजप खासदार गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग यांच्याकडे मदत मागितली आहे. या महिला क्रिकेटपटूने 30 डिसेंबर रोजी ट्विट करून गौतम गंभीरकडे मदत मागितली. तर दुसऱ्या दिवशी वीरेंद्र सेहवागकडे मदत मागितली. यावर दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दिल्लीच्या या महिला क्रिकेटरने आपली व्यथा स्वत:च्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत मांडली आहे. या ट्विटमध्ये, माझ्या प्रशिक्षकाने कारकिर्द संपवून टाकेन अशी धमकी देत बलात्काराचा प्रयत्न केला आहे, असा खळबळजनक खुलासा केला आहे. या महिला क्रिकेटरने या ट्विटनंतर दिल्ली क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या क्रिकेटरच्या तक्रारीची दखल #MeTooIndia ने घेतली आहे.

प्रशिक्षकाचे ट्विटमध्ये नाव नाही
महिला क्रिकेटपटूने आपली तक्रार करताना संबंधीत प्रशिक्षकाचे नाव लिहले नाही. ट्विट केलेल्या या पोस्टमध्ये मी दिल्लीची एक महिला क्रिकेटपटू आहे. माझा प्रशिक्षक माझा विनयभंग आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला विरोध केला तर तो माझे करिअर संपवण्याची धमकी देतो. प्रशिक्षकाचे आणि निवड समितीतील सदस्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे माझ्या क्रिकेट करिअरला ब्रेक लावण्याची धमकी देत आहे. कृपया याची दखल घेत मला मदत करा असे तिने गौतम गंभीरला टॅग करत सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/