‘या’ प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंनी समलैंगिक पार्टनरबरोबर थाटलाय संसार

पोलिसनामा ऑनलाइन – क्रिकेट जगतात अशा काही महिला क्रिकेटपटू आहेत ज्यांनी समलैंगिक पार्टनरला त्यांची जीवनसाथी म्हणून निवडलं. . काही जणी तर एकाच संघासाठी देखील खेळत आहेत. जाणून घेऊ यांच्याविषयी ….

– मेगन स्कटने तिची गर्लफ्रेंड जेस होलोओके बरोबर २०१८ मध्ये लग्न केलं. २०१७ मध्ये तिला मेगनने प्रपोज केलं होतं, ५ सेकंदात तिने ते स्विकारलं देखील होतं. मेगन एक युवा ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर आहे. तिने अनेक सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. होलोओके क्रिकेट बॅकग्राउंडची नाही आहे.

– अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल हिने २०१५ मध्ये तिने गर्लफ्रेंड लिन्स स्क्यू बरोबर इंग्लंडमध्ये कायदेशीररित्या लग्न केलं. कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता नव्हती. अ‍ॅलेक्झँडर जॉय ब्लॅकवेल ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आहे. न्यू साउथ वेल्समध्ये जन्मलेल्या या क्रिकेटरने २५१ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. काही काळासाठी तिने कर्णधार पदाची जबाबदारी देखील स्विकारली होती. २०१३ मध्ये तिने ती Lesbian असल्याचे सांगितले होतं .

– एमी सॅटर्थवेट आणि ली ताहुहू यांनी २०१७ मध्ये दोघींनी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्या चर्चेचा विषय बनल्या होत्या. त्या एकमेकींना जवळपास ८ वर्ष ओळखत होत्या. २०१४ मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. एमी आणि ली त्यांच्या लव्ह लाइफबद्दल नेहमी लो प्रोफाइल राहिल्या आहेत. एमी आणि ली दोघी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सदस्य आहेत. एमी ऑल राउंडर असून ली वेगवान गोलंदाज आहे. दोघी सोशल मीडियावर सक्रीय असून समलैंगिक रिलेशनशीपबाबत त्यांनी वेळोवेळी त्यांची मतं मांडली आहेत.

– डेन वान निकर्क आणि मारियानी कॅप यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होते. या दोघी दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील आहेत. डेन आणि मारियानी दोघी ऑलराउंडर आहेत. मैदानात देखील दोघींची चांगली पार्टनरशीप असते. दक्षिण आफ्रिकेसाठी मुख्य विकेट पटकावणाऱ्या या दोन खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त दोघी बिग बॅश क्रिकेट देखील एकत्र खेळतात. दोघी दीर्घकाळापासून डेट करत होत्या.

– जेस जोनासनची गर्लफ्रेंड क्रिकेट विश्वातली नाही. जेसने फेब्रुवारी २०१८ मध्ये सारा वियर्न प्रपोज केले होते. यावर्षी दोघी लग्न करणार होत्या, पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोघांच्याही लग्नाला काहीसा ब्रेक लागला आहे. जेस जोनासन ऑस्ट्रेलियन महिला संघातील गोलंदाज आहे. ती की गेंदबाजी ऑल राउंडर हैं. ती लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स स्पिन बॉलिंग करते. तिने १३० आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. जेसची गर्लफ्रेंड क्रिकेट विश्वातली नाही.

– डेलिसा केमिन्स आणि लॉरा हॅरिस हे गेल्या चार वर्षांपासून डेट करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटू डेलिसा केमिन्स आणि लॉरा हॅरिस यांनी कोरोना व्हायरस कालावधीत लग्न केले. या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध झालेल्या टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात केमिन्स ऑस्ट्रेलियन संघाची सदस्य होत्या.

– २०१९ मध्ये न्यूझीलंडची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर हेली जेन्सनने तिची जोडीदार निकोला हॅनकॉकशी लग्न केले. निकोलाला अद्याप राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही, परंतु जेन्सन हे न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात आहे. निकोला ऑस्ट्रेलियाची रहिवाशी असून दोघी बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न संघासाठी खेळतात. निकोला एक स्टार बॉलर असून ती ऑस्ट्रेलियामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळते.