पंकजा मुंडे यांचे ‘ते’ विधान तथ्यहीन : वंदना चव्हाण

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन 

महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (दि.१०) पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांची टीका तथ्यहीन असून अत्यंत खालच्या पातळीची व अशोभनीय आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही.अशा शब्दात त्यांनी सुनावले.

शरद पवार यांची राजकीय आणि सामाजिक उंची समजण्या इतकी त्यांची बौद्धिक उंची नसल्यामुळे हे असे वक्तव्य त्यांच्याकडून वारंवार होत असावे. भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांचे महत्व व देशाच्या राजकारणातील स्थान समजते, पण त्यांच्या नावावर निवडून आलेल्या पंकजा मुंडेना हे समजत नाही. हे भारतीय जनता पार्टीचे दुर्दैव आहे. तसेच पंकजा मुंडेनी आपल्या वयाचे आणि अनुभवाचे भान ठेऊन बोलले पाहिजे. कै. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू नंतर जी मदत शरद पवार यांनी केली याची तरी जाणीव त्यांनी मनात ठेवणे गरजेचे आहे. असेही या पत्रकात म्हटले आहे.