महिला शिक्षीकेचे विद्यार्थ्याशी ‘संबंध’, कॅम्पसच्या बाहेर भेटायचे, पुढं झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेमधील फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिला शिक्षिकेला आपल्या विद्यार्थ्याशी संबंध ठेवल्यामुळे अटक करण्यात आली आहे. हि महिला 28 वर्षीय असून तिच्या विद्यार्थ्याचे वय हे 16 वर्ष आहे. ती शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बास्केटबॉल शिकवत असे. मेगन पॅरिस असे तिचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाशी संबंध ठेवल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. शाळेतील एका मुलाने याविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तिला अटक केली. 2017 मध्ये या ठिकाणी रुजू झाली असून बास्केटबॉल बरोबरच गणित देखील शिकवत असे. वर्षाला २८ लाख रुपये तिला वेतनस्वरूपात दिले जात असतं.

7 महिन्यांच्या तापसांनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. दरम्यान, हि महिला शिक्षिका बाहेर या विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध देखील बनवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यावर तिच्या वकिलांनी बोलण्यास नकार दिला असून पोलीस आधिक तपास करत आहेत.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like