70 लाखाचा घोटाळा करून ‘फरार’ महिला पोलीस निरीक्षक, माहिती देणाऱ्यास 25 हजाराचं ‘बक्षीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 70 लाख रुपयांचा घोटाळा करणारी महिला पोलीस निरीक्षक लक्ष्मी सिंह चौहान सहित सात पोलीस कर्मचाऱ्यांवर डिपार्टमेंटने 25 – 25 हजारांचा इनाम घोषित केला आहे. घोटाळा करून फरार असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी इनामाची घोषणा गाजियाबादचे एसएसपी सुधीर कुमार यांनी केली आहे.

आरोपींची संपत्ती जप्त
पोलीस निरीक्षक लक्ष्मी सिंह चौहान सहित सात पोलीस कर्मचाऱ्यांना शरण देणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करन्यासाठी पोलिसांनी कर्मचाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

मेरठ न्यायालयात होऊ शकतात स्वाधीन
फरार असलेले आरोपी आणि लक्ष्मी सिंह चौहान हे आज मेरठ न्यायालयात आत्मसमर्पण करू शकतात अशी सर्वत्र चर्चा आहे. यासाठी पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. लवकरात लवकर सर्व आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरु आहेत.

न्यायालयाने फेटाळला होता जामीन अर्ज
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने सर्व आरोपीना झटका देत त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. लक्ष्मी सिंह चौहान आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील सत्तर लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे यासंबंधी साहिबाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

काय आहे नेमका प्रकार
24/25 सप्टेंबर 2019 च्या रात्री लक्ष्मी सिंह चौहानने इतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत राजीव सचान आणि आमिर या दोन आरोपीना एटीएम लुटण्याच्या आरोपावरून अटक केली होती. या अटकेनंतर पोलिसांनी आरोपीकडून 45,81,500 रुपये इतकी रक्कम जप्त केल्याचे लेखी तक्रारीत म्हंटले होते. मात्र सीओ राकेश मिश्रा यांनी विचारपूस केल्यानंतर राजीवकडून 55 लाख रुपये आणि आमिरकडून 60 ते 70 रुपये जप्त केले आहेत.

Visit : Policenama.com