शाळकरी मुलांकडून ‘मसाज’ करून घेत शिक्षीका, ‘व्हिडिओ’ समोर आल्यानंतर झाली 5 वर्षाची ‘शिक्षा’

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – अकोला जिह्यात समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिक्षकी पेशाला काळे फासण्यात आले. अकोल्यात एका महिला शिक्षिकेने आपल्या पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार केला. ही शिक्षिका विद्यार्थ्यांकडून आपल्या पायांची मालिश करुन घेत होती. न्यायालयाने या शिक्षिकेबाबत पुरावा मिळाल्यानंतर शिक्षा म्हणून पॉक्सो कायद्यांतर्गत 5 वर्ष शिक्षा आणि 30 हजार रुपयांच्या दंड ठोठावण्यात आला. आरोपी महिला शिक्षिकेचे नाव शीतल अवचार आहे. ही महिला मलकापूर स्थित मूक बधिर शाळेत सरकारी शिक्षिका होती.

2013 साली आरोपी शिक्षेका विद्यार्थ्यांकडून पायाची मालिश करुन घेत असल्याची तक्रार मुलांच्या नातेवाईकांना पोलिसात दाखल केली होती. न्यायालयाने 6 वर्षानंतर या आरोपी शिक्षिकेला शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने शिक्षिकेला दोषी ठरवतं 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मलकापूर स्थित मुक बधिर शाळेत शीतत अवचार विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ती शाळेत मुलांना शिकवण्याऐवजी मालिश करुन घेत होती. जेव्हा असे अनेकदा झाले तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी या शिक्षिकेविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणातील एक व्हिडिओ देखील समोर आला.

या व्हिडिओमध्ये दिसते की शिक्षिका मुलांकडून कशा प्रकारे खूर्चीवर बसली आहे आणि कसे पाय पुढे करुन एका विद्यार्थ्याकडून पायाची मालिश करुन घेत आहे. मालिश करताना शिक्षिका हसत हसत मध्येच मुलांशी बोलत आहे. या दरम्यान काही विद्यार्थी तेथून येता जाताना दिसतात परंतू ही शिक्षिका मुलांकडून मालिश करुन घेणे बंद करत नाही.
शिक्षिका असे बऱ्याच दिवसांपासून वागत होती. एक दिवस जेव्हा ही शिक्षिका मुलाकडून मालिश करुन घेत होती तेव्हा तिचा हा व्हिडिओ तयार करण्यात आला. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा हे प्रकरणं उघड झाले.

न्यायालयाने शिक्षिका शीतल अवचार वर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या शिक्षिकेला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर 30 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

Visit : Policenama.com