घरात ‘या’ दिशेला फेंग्शुई ऊंट ठेवल्यानं दूर होणार तुमच्या घरातील पैशाच्या सर्व अडचणी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुमची वाईट वेळ सुरु असेल तर तुम्ही घरामध्ये फेंग्शुई गॅजेटच्या रूपातील ऊंट लावल्याने तुमचा फायदा होऊ शकतो. यामुळे तुमची अडचण दूर होऊन तुम्हाला अधिक लाभ होण्यासाठी देखील तुम्ही या उंटाची घरात वायव्य दिशेला स्थापना करू शकता. तुमचे पैसे कुणाकडे अडकले असतील आणि तुम्हाला वेळेवर मिळत नसतील तर तुम्ही हा उपाय निश्चितच करायला हवा. केवळ घरातच नव्हे तर तुमच्या ऑफिसमध्ये देखील वायव्य दिशेला या दोन कुबड्या असणाऱ्या उंटाची स्थापना केल्याने तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.

फेंग्शुईनुसार, या उंटाची स्थापना केल्याने तुमच्यावर येणारे संकट आणि दुर्भाग्यापासून तुमची सुटका होऊ शकते. या प्राण्याला प्रचंड उर्जावान आणि प्रतिभावान समजले जाते. सर्व प्राण्यांमध्ये केवळ उंट अनेक दिवस काहीही न खाता पिता जिवंत राहू शकते. तुमच्या कुटुंबात जर सतत कुणी आजारी पडत असेल तर या गॅजेटमुळे देखील तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. घरातील उत्तर-पश्चिम भागात याची स्थापना केल्याने तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, चायनीज फेंगशुईमध्ये अशाप्रकारे अनेक गॅजेट उपलब्ध असून या गॅजेटच्या मदतीने तुमचे आयुष्य सुखकर होत असल्याची प्रथा आहे.

Visit : policenama.com