घरात कासव ठेवल्याने होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – कासव फक्त धन प्राप्तीसाठीच उपयुक्त नसते तर आयुष्यातील अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचवत असते. फेंग शुईमध्ये याबाबत सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. असं म्हणतात की कासव हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे. हेच कारण आहे की कासव घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी, तुम्ही कासवाला पाळू देखील शकता किंवा घरात फोटो आणि चिन्ह देखील ठेवू शकतात. जाणून घेऊया की कासवामुळे कोण-कोणत्या त्रासांपासून दिलासा मिळतो.

१) नोकरीत पदोन्नती मिळण्यासाठी
जर एखाद्या व्यक्तीस व्यावसायिक जीवनात अडचणी येत असतील किंवा नोकरी मिळत नसेल तर फेंग शुईच्या मते, घरात कासव पाळावे. जर तुम्ही पाळू शकत नसाल तर तुम्ही कासवचे चिन्ह देखील घरात ठेवू शकता. विशेषत: पितळचे कासव घरात ठेवल्याने जास्त फायदा होतो.

२) धनसंबंधी समस्या असेल तर
फेंगशुईच्या मते, जर कुणाला धनसंबंधी समस्या असतील तर त्यांनी क्रिस्टलचा कासव घरात ठेवावा. असे केल्याने आवक तर वाढेलच तसेच हळू हळू पैशासंबंधित सर्व समस्या देखील दूर होतील.

३) शत्रूंपासून त्रास होत असेल तर
जर कुणाला वारंवार विरोधकांचा सामना करावा लागत असेल आणि सर्व प्रयत्न करूनही शत्रू त्रास देतच असेल तर आपण घरात कासवाचे चिन्ह उत्तर दिशेकडे ठेवावे. फेंग शुईच्या मते, कासवाचे चिन्ह नसल्यास कासवाचा फोटो देखील ठेवू शकता.

४) नकारात्मकता दूर करतो
फेंगशुई यांच्या मते, घरात कासव ठेवल्याने नकारात्मकता दूर होत असते. याशिवाय हे घराला वाईट नजरेंपासून देखील वाचवते, म्हणून कासव किंवा त्याचे चिन्ह घरात ठेवणे महत्वाचे आहे. यामुळे घरात आनंद आणि शांती टिकून राहते. फेंगशुईच्या मते यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर कासवाचे चित्र लावले पाहिजे.