‘बडीशेप’चे पाणी उन्हाच्या त्रासापासून करते बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या कडक उन्हामुळे बाहेर फिरणेदेखील त्रासदायक झाले आहे. अशा अति उन्हामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. उष्माघातासारखा त्रास झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो. अनेकदा जीव देखील गमवावा लागतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय असून बडीशेपचे पाणी खूपच गुणकारी आहे. दररोज उपाशीपोटी बडीशेपचे पाणी पिणे प्रत्येक ऋतुमध्ये अत्यंत फायदेशीर असते. उन्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो.

बडीशेपच्या दाण्यांमध्ये डाययुरेटिक गुण असतात. या पाण्याने युरीनसंबंधी समस्या दूर होतात. निर्विषीकरणातही ते मदत करतात. नियमितपणे हे पाणी प्यावे. यामुळे यकृताशी संबंधित रोग दूर होतात. बडीशेपपासून तयार केलेले पाणी थंड असते. यात वेलची पावडर टाकून पिल्याने उन्हापासून बचाव होतो. तसेच या पाण्यात काळे मीठ टाकून पिल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

बडीशेपच्या पाण्यात एक चमचा मध टाकून रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन झपाट्याने घटते. यामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. बडीशेपच्या पाण्याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत मिळते. बडीशेपचे पाणी बनविण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात बडीशेप टाका आणि रात्रभरासाठी झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. बडीशेपचे हे उपाय केल्यास उन्हापासून तुमचा सहज बचाव होऊ शकतो.

आरोग्य विषयक वृत्त –

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत 

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास