Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fenugreek Benefits | आजकाल लोकांची जीवनशैली (Lifestyle) इतकी वाईट झाली आहे की प्रत्येक घरातील एखादी व्यक्ती रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाशी (Blood Pressure, Obesity, Diabetes, Heart) संबंधित धोकादायक आजारांच्या विळख्यात आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीचे खाणे आणि वाईट दिनचर्या. यासोबतच लोक तणावाचाही सामना करत आहेत (Fenugreek Benefits). आजकाल जंक फूडच्या (Junk food) अतिसेवनामुळे तरुणांना हे आजार जडले आहेत, जे खूप चिंताजनक आहे. तुमची दिनचर्या निश्चित करून, योग्य आहार आणि दैनंदिन व्यायामाद्वारे यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. यामुळे शुगर, कोलेस्ट्रॉल (Sugar, Cholesterol) आणि रक्तदाब वाढण्याची समस्या कमी होऊ लागते. यादरम्यान, जर तुम्ही एका फायदेशीर भाजीचा आहारात समावेश केला तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली सिद्ध होते.

 

कोणती आहे ती भाजी?
मेथीबद्दल सर्वांना माहिती आहे. मेथी ही एक अशी शक्तिशाली भाजी आहे. ती अनेक प्रकारचे आजार कमी करण्यास मदत करू शकते. यामध्ये आढळणारे स्टेरॉईडल सॅपोनिन नावाचे पोषकतत्व खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम (Calcium, Selenium, Manganese, Magnesium, Potassium, Niacin, Fiber, Protein, Iron, Potassium) मुबलक प्रमाणात मेथीमध्ये आढळते. (Fenugreek Benefits)

पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. मेथीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि स्टेरॉइडल सॅपोनिन गुणधर्म देखील असतात. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी देखील मेथीमध्ये आढळते जे डोळे आणि त्वचेसाठी देखील चांगले आहे. मेथी मधुमेहाच्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक औषधाप्रमाणे काम करते.

 

मेथीचे अनेक फायदे

1. शुगर कमी होते.

2. कोलेस्ट्रॉल कमी होतात.

3. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4. मेथी पाचन तंत्राशी संबंधित समस्या दूर करून पचनक्रिया सुधारते.

5. मेथीमध्ये आढळणारे फायबर त्वचेचा कोरडेपणा दूर करून त्वचेची चमक वाढवते.

6. लठ्ठपणाची समस्या कमी होते.

7. मेथीमध्ये आढळणारे प्रोटीन हाडे मजबूत करते आणि बोन मेटाबॉलिज्म सुधारते.

8. केसगळतीच्या समस्येवर मेथी औषधाप्रमाणे काम करते.

9. ती आमांशमध्ये पोटदुखीपासून आराम देते.

10. हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर सिद्ध होते.

11. सूज येण्याची समस्या असल्यास मेथीची पाने आणि बिया बारीक करून घेतल्यास आराम मिळतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fenugreek Benefits | eating fenugreek vegetable controls sugar cholesterol and blood pressure benefits of fenugreek seeds methi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Police Personnel Suspended | …म्हणून पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Pune Rural Police | डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा पुण्यात मृत्यू, दहा दिवसांचे बाळ झालं पोरकं

Congress Ashok Chavan | अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करा, काँग्रेस नेत्यांची मागणी