Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fenugreek-Methi Leaves Benefits | हिवाळ्यात सर्व पालेभाज्या दिसू लागतात. यामध्ये सर्वात लाभदायक आहे मेथीची भाजी. मेथीच्या पानांचा वापर करून भाजी, पराठे, मेथीवडी इत्यादी पदार्थ बनवले जातात. मेथीच्या बी प्रमाणेच तिची पानेही खुप लाभदायक (Fenugreek leaves benefit) असतात. मेथीच्या पानांचा शरीराला कशाप्रकारे फायदा होतो ते जाणून घेवूयात. (Fenugreek-Methi Leaves Benefits)

 

1. डायबिटीजमध्ये लाभदायक –
मेथीची पाने टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज दोन्हीमध्ये खुप लाभदायक असतात. मेथी शरीरात इन्सुलिनची मात्रा वाढवते जे डायबिटीज रुग्णांसाठी आवश्यक आहे. यातील फायबरमुळे पचनक्रिया हळुहळु होते, ज्यामुळे शरीरात शुगरचे शोषण लवकर होत नाही. (Fenugreek-Methi Leaves Benefits)

 

2. कोलेस्ट्रॉल कमी करते –
मेथीची पाने कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करते. यामुळे डायबिटीजच्या रूग्णांसह एथेरोस्क्लेरोसिसच्या रूग्णांनाही लाभ होतो.

 

3. पचन सुधारते मेथी –
मेथीच्या पानांमध्ये फायबरसह अ‍ॅटीऑक्सिडेंट गुण सुद्धा असतात. ज्यांना पोटाच्या समस्या असतात त्यांंनी मेथी आवश्य खावी. तसेच आतड्यांची सूज आणि पोटाच्या अल्सरमध्ये सुद्धा लाभदायक आहे. अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. (Fenugreek-Methi Leaves Benefits)

 

4. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन वाढवते –
मेथी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोनचे उत्पादन वाढवण्याचे काम करते. मेथीमध्ये फुरोस्टेनॉलिक सॅपोनिन (furostanolic saponins) असते, जे टेस्टोस्टेरोन वाढवते. यामुळे मेथी लैंगिक इच्छा वाढवते, असे अनेक संशोधनात आढळून आले आहे.

5. हृदयाच्या रूग्णांसाठी लाभदायक –
मेथी कोलेस्ट्रॉल कमी करते ते हृदयाच्या रूग्णांसाठी आवश्यक आहे. मेथीची पाने जडीबुटीप्रमाणे काम करतात जे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक आल्यास रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

 

6. वजन कमी करण्यात उपयोगी –
एक कप मेथीच्या पानांमध्ये केवळ 13 कॅलरी असतात. याच्या थोड्या मात्रेने सुद्धा पोट भरल्यासारखे वाटते, लवकर भूक लागत नाही, यामुळे वजन कमी होते.

 

7. इम्फ्लेमेशन कमी करते –
मेथी शरीरात इम्फ्लेमेशनचा स्तर कमी करते. ही जुना खोकला, फाडे, ब्रोंकायटिस आणि एक्झिमासह त्वचेच्या अनेक आजारांसोबत लढण्यास मदत करते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fenugreek-Methi Leaves Benefits | fenugreek methi leaves benefit diabetes winter methi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | आगामी महापालिका निवडणुक भाजप-शिंदे गट युतीकरुन लढवणार?, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार

T20 World Cup | Virat Kohli ने ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मांडले मत, सांगितले हे कारण