फर्ग्युसनमध्ये ‘मी सावरकर’ला पुरोगामी विद्यार्थी संघटनांचा विरोध, शरद पोंक्षेंची मागच्या दरवाजाने ‘एन्ट्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे पुरोगामी विद्यार्थी संघटनेने त्याला विरोध दर्शवत निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी शरद पोंक्षे यांचा निषेध करणारी पोस्टर झळकावल्याने या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे न जाता शरत पोंक्षे हे सभागृहाच्या पाठीमागच्या दरवाजाने सभागृहात पोहचले.

पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसे याचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षे यांच्या विरोधात पोस्टर दाखवत घोषणा दिल्या. याला प्रत्युत्तर देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील घोषणा दिल्या. यामुळे महाविद्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतली. अखेर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये हा कार्य़कम सुरु झाला.
अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि पुरोगावी विद्यार्थी संघटनांच्या घोषणाबाजीमुळे तणावाचे वातावरण बनले होते. अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम होणार का अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. मात्र, शरद पोंक्षे हे वेळेमध्ये सभागृहात पोहचले आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला. या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, या आधी ही अनेक वक्ते इथे येऊन गेले आहेत. या वर्षी शरद पोंक्षे यांना निमंत्रित केले होते. सावरकरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, हे ‘आम्ही खपवून घेणार नाही’ असे असं म्हणत कार्यक्रमाचे आयोजक रणजित नातू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.