दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमला अरूण जेटलींच नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री, मुख्य राजनीतीकार, त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारचे पहिल्या पर्वातील मुख्य संकटमोचक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे नवी दिल्ली येथील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक दिग्गज खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला मिळाले आहेत. त्यामुळे नवी दिल्ली येथील फोरज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय आज (मंगळवार) घेण्यात आला आहे.

जेटली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष आणि दिल्ली असोसिएशनचे अध्यक्ष होते. १२ सप्टेंबरला एका सोहळ्यात कोटला स्टेडियमचे नामांतर करण्याचा निर्णय दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. यापूर्वी स्टेडियममधील एका स्टँडला टीम इंडीचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देण्यात आले आहे.

दिल्ली जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यासारखे खेळाडू घडले आहेत. भारताचा माजी सलामीवीर गंभीरने यमूना स्पोर्स्टस कॉम्प्लेक्सचे नाव बदलून अरुण जेटली स्पोर्स्टस कॉम्प्लेक्स करावे अशी मागणी केली आहे.

जेटली यांच्याकडून सेहवागची मनधरणी
विरेंद्र सेहवाग दिल्ली क्रिकेट कडून खेळत होता. मात्र, अंतर्गत राजकारणाचा त्याला फटका बसला होता. त्यामुळे त्याने दिल्ली क्रिकेट संघाकडून खेळण्यास नकार देत संघाला अलविदा देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावेळी अरुण जेटली यांना हे समजले त्यावेळी त्यांनी सेहवागशी संपर्क साधला. त्याच्याबरोबर बाचतचीत करून त्याची मनधरणी केली. अखेर सेहवागने हरियाणा संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like