धक्‍कादायक ! डॉक्टरच बनला ‘स्पर्म डोनर’, जन्माला घातले 11 मुलं, त्यानंतर लायसन्स रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉक्टरांना खरे तर पृथ्वीवरील देव म्हटले जाते. कोणत्याही आजारावर माणूस डॉक्टरकडेच जात असतो. त्यामुळे देवानंतर माणूस आजारपणात डॉक्टरवर विश्वास ठेवत असतो. मात्र कॅनडामधील एका डॉक्टरने या पेशाला काळिमा फासण्याचे काम केले आहे. या डॉक्टरवर आरोप करण्यात आला आहे कि, त्याने महिलांना गर्भधारणेसाठी स्वतःच्या वीर्याचा वापर केला आहे. मुलं न होणाऱ्या महिलांना गर्भवती करण्यासाठी त्याने आपल्या वीर्याचा वापर करत या महिलांना गर्भवती केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून त्याचे मेडिकल लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

८० वर्षांच्या बनार्ड नॉरमन या डॉक्टरचे स्वतःचे हॉस्पिटल असून तो ज्या महिला नैसर्गिकरित्या गर्भवती राहू शकत नाहीत त्या महिलांना कृत्रिम पद्धतीने गर्भवती करण्याचे काम तो आपल्या हॉस्पिटलमध्ये करत असे. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे कि, अनेक वर्षांपासून त्याच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या महिलांना गर्भवती करण्यासाठी तो आपल्या वीर्याचा वापर करत असे. या प्रकरणात त्याने ११ महिलांना गर्भवती करण्यासाठी आपल्या वीर्याचा वापर केल्याचा आरोप आहे.

एका महिलेने वीर्य दान करणाऱ्याची माहिती मागितली असता हा प्रकार पुढे आला त्याचप्रमाणे दुसऱ्या एका महिलेने जन्म दिलेल्या मुलाला सीलियाक नावाचा आजार झाल्यानंतर लक्षात आले. हि घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई करत त्याला १० हजार कॅनडियन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. तसेच त्याचे मेडिकल लायसन्स देखील रद्द करण्यात आले. याआधी देखील त्याला २०१४ मध्ये अशाच प्रकरणात समज देण्यात आली होती.

दरम्यान, या डॉक्टरवर मेडिकल कौन्सिलच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली असली तरी त्याला या प्रकरणात न्यायालयीन शिक्षा देखील होऊ शकते.

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दलित, वंचितांच्या जागा बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश