फायद्याची गोष्ट ! फेस्टिव्ह सीझनमध्ये क्रेडिट कार्ड कंपन्या देताहेत मोठी सूट, शॉपिंगवर ‘या’ पद्धतीनं वाचवा पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीझनमध्ये अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू झाले आहेत. सोबतच अन्य कंपन्यांनी सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षक ऑफर्ससोबत सेलची घोषणा केली आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना मोठी सूट आणि आकर्षक ऑफर्स देण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि फायनान्स कंपन्यांसोबत मोठी डील केली आहे. ई-कॉमर्स कंपन्या कोणकोणत्या कंपन्यांच्या क्रेडिट कार्डवर सूट आणि ऑफर सादर करत आहेत, ते जाणून घेवूयात.

HDFC क्रेडिट कार्डवर स्पेशल फेस्टिव्ह ऑफर्स
ऑनलाइन खरेदीसाठी एचडीएफसी आपल्या क्रेडिट कार्डधारकांना सुरूवातीपासूनच ऑफर देत आहे. कंपनीच्या क्रेडिट कार्डद्वारे सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, एलजी, सोनी, रिलायन्स डिजिटल, वोल्टास, गोदरेज, कूरियर, व्हर्लपूलसह अन्य कंपन्यांचे प्रॉडक्ट खरेदी केल्यास ग्राहकांना 22.5 टक्केपर्यंत कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळत आहे.

ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विगी आणि झोमाटोवर ऑर्डर बुक केल्यास एचडीएफसी आपल्या कार्डधारकांना ताबडतोब सूट आणि कॅशबॅक देत आहे. यासोबतच लूईस फिलिप, पीटर इंग्लंड, वॅन ह्युसेन, अदिदास, फॉरएव्हर 21 आणि टर्टल आदि प्रीमियम ब्रँडवर खरेदी केल्यास सुद्धा ताबडतोब सूट आणि कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

SBI क्रेडिट कार्डवर स्पेशल फेस्टिव्ह ऑफर्स
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या क्रेडिट कार्डधारकांना फ्लिपकार्टने खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टट डिस्काऊंटची ऑफर देत आहे, जी 21 ऑक्टोबरपर्यंत मान्य आहे. एसबीआय सिंपलीक्लिक कार्ड आपल्या एक्सक्लूसिव्ह पार्टनर्स अमेझॉन, बुकमायशो, क्लियरट्रिप, लेंसकार्ट, नेटमेड्स आणि अर्बनक्लॅपवर 10 X आणि अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यास 5X रिवॉर्ड पॉईंट ऑफर देत आहे. 1 ते 2 लाखाच्या वार्षिक खरेदीवर कंपनी 2 हजार रुपयांचे ई-व्हाउचर सुद्धा देत आहे. तर, फ्यूअल स्टेशनवर प्रत्येक (500 ते 3000 हजार रुपयांदरम्यान) ट्रांजक्शनवर फ्यूअल सरचार्ज वर 1 टक्का सूट सुद्धा देत आहे.

AXIS बँक क्रेडिट कार्डवर सूट
कंपनी आपल्या क्रेडिट कार्डधारकांना फ्लिपकार्ट, मंत्रा, आणि 2गुडवरून खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक ऑफर देत आहे. क्युअरडॉट फिट, गोआयबीबो, मेकमायट्रिप, पीव्हीआर आणि उबरवर अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांना 4 टक्के कॅशबँक ऑफर मिळत आहे. तर, सर्व अन्य वस्तूंवर 1.5 टक्के कॅशबॅक ऑफर आहे. फ्यूअल स्टेशनवर प्रत्येक (400 ते 4000 हजार रुपयांदरम्यान) ट्रांजक्शनवर फ्यूअल सरचार्जवर 1 टक्का सूट मिळत आहे आणि पार्टनर रेस्टॉरंटमध्ये डिनरवर 22 टक्के सूट देत आहे.

अमेझॉन पे-ICICI कार्डवर ऑफर्स
अमेझॉन डॉट इनवर प्राइम मेंबर्ससाठी 5 टक्के आणि इतरांना 3 टक्के कॅशबॅक ऑफर मिळत आहे आणि 100 पेक्षा जास्त अमेझॉन पे पार्टनर मर्चंटना 2 टक्के आणि इतर सर्व खरेदीवर 1 टक्के कॅशबॅक ऑफर सुरू आहे. 2500 रेस्टॉरंटमध्ये डिनरवर कुलीनरी ट्रीट्स प्रोग्रामअंतर्गत 15 टक्केची बचत करण्याची संधी तुमच्याकडे आहे. फ्यूअल स्टेशनवर प्रत्येक ट्रांजक्शनवर फ्यूअल सरचार्जवर 1 टक्केची सूट सुद्धा मिळत आहे.

HSBC क्रेडिट कार्डवर सूट
एचएसबीसी क्रेडिट कार्डधारकांना स्विगीवर 400 रुपयांच्या वरील ऑर्डरवर 20 टक्के सूट मिळत आहे. ही सूट 100 रुपयांपर्यंतची आहे, जी एक महिन्यात एकदाच मिळेल. तर, अमेझॉनवर एक हजार आणि त्यापेक्षा जास्त शॉपिंगवर 5 टक्के (250 रुपये कमाल) ची सूट मिळत आहे. सर्व ऑनलाइन खरेदी (वॉलेटमध्ये फंड ट्रान्सफरचा सुद्धा समावेश) वर 1.5 टक्के आणि सर्व सामान्य वस्तूंच्या खरेदीवर 1 टक्केची सूट मिळत आहे. तर, एक हजारपेक्षा जास्त रेस्टॉरंटवर 15 टक्केपर्यंत सूट मिळेल.