मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील एक गट ‘नाराज’, सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इतक्या दिवसांपासून रखडलेला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी पार पडला. मात्र मंत्रिमंडळ विस्तार होत एक दिवस होतो ना होतो, त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गट मंत्रिमंडळाच्या स्वरूपाबद्दल संतप्त असल्याची माहिती समोर येत आहे. प्रणिती सुशील शिंदे, नसीम खान, अमीन पटेल, संग्राम थोपटे या नेत्यांनी राज्य समितीसमोर नाराजी व्यक्त केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींची दिशाभूल केल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. नाराज नेत्यांचा गट सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला जाण्याचाही विचार करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संतप्त नेत्यांनी असा आरोप केला की, ज्यांनी निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम केले त्यांनाच प्राधान्य दिले गेले. काँग्रेसच्या निष्ठावंतांना बाजूला करण्यात आले.

मंत्रिमंडळाचा विस्तार :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून २६ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्री यांचा समावेश केला. ३६ मंत्र्यांपैकी १४ राष्ट्रवादीचे, १२ शिवसेनेचे आणि १० काँग्रेसचे नेते आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/