रेल्वेत जागेवरून वाद झाल्यानंतर ‘नियोजित’ नवर्‍याला केला फोन, मदतीसाठी पाठवलेल्या 3 मित्रांनीच केला ‘गँगरेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात होणाऱ्या नवऱ्याच्या तीन मित्रांनी मित्राच्या होणाऱ्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तिघेजण महिलेचा रेल्वेत वाद झाल्याने तिला त्यातून वाचवण्यासाठी आले होते, परंतु परत येताना मदतीनंतर या तिघांनी महिलेबरोबर अतिप्रसंग केला. पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे प्रकरण बुलंदशहर जनपदच्या मच्या हद्दीतील आहे. पोलिसांच्या मते महिला जनपदच्या अरनिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणारी आहे आणि सध्या गाजियाबादमध्ये राहत आहे.

आसनाच्या जागेवरुन वाद –
महिला बुधवारी रेल्वेने अरनियाहून गाजियाबादला जात होती. दरम्यान रेल्वेत आसनावर बसण्यावरुन काही लोकांशी महिलेचा वाद झाला, तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला फोन करुन घटनेची माहिती दिली आणि मदत मागितली. यानंतर महिलेच्या होणाऱ्या नवऱ्याने आपल्या तिघा मित्रांना मदतीसाठी स्टेशनवर पाठवले.

वाद मिटल्यानंतर महिला या तिघांसह मोटार सायकलवर बसून निघाली होती, या दरम्यान या तिघांनी महिलेवर बलात्कार केला. पोलिसांचा दावा आहे की एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. बुलंदशहरचे एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी घटनेचा निष्पक्ष तपास करुन आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

You might also like