Fiber Benefits In Diabetes | जाणून घ्या मधुमेहामध्ये फायबरयुक्त गोष्टींच्या सेवनावर भर का दिला जातो?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fiber Benefits In Diabetes | मधुमेह (Diabetes) ही जागतिक स्तरावरील गंभीर आरोग्य समस्या आहे. विशेषत: मधुमेहींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood Sugar Level Control) करण्यास मदत करणार्‍या गोष्टींचे अधिक सेवन करण्यावर भर द्यायला हवा. मधुमेहाच्या आहारात (Diabetes Diet) फायबरयुक्त गोष्टींचा (Fiber Rich Foods) समावेश करण्याबाबत आपणही अनेकदा तज्ज्ञांकडून ऐकलं असेल. फायबर हे एक पोषक तत्व आहे (Fiber Is Nutrient) जे मुख्यतः पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते (Fiber Eliminate Digestive Problems) , मग मधुमेहात त्याचे सेवन करणे का योग्य आहे (Fiber Benefits In Diabetes) ?

 

आरोग्य तज्ञांच्या मते, शरीराला अधिक चांगले काम करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दररोज अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, फायबर देखील त्यापैकी एक आहे. हे मुख्यतः अन्नाचे पचन सुलभ करण्यात, आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात फायबर अत्यंत लाभदायक आहे. म्हणूनच मधुमेहींना फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात पुढे (Fiber Benefits In Diabetes).

मधुमेहात फायबरयुक्त गोष्टींचे फायदे (Benefits Of Fiber-Rich Foods In Diabetes) : रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश मधुमेहींसाठी आवश्यक बाब म्हटली पाहिजे. हे केवळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवत नाही, तर मधुमेहामुळे उद्भवणार्‍या आरोग्याच्या इतर गुंतागुंतांमध्येही त्याचे फायदे दिसून आले आहेत. फायबरयुक्त आहार आपल्याला पोट निरोगी ठेवण्यास, रक्तातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका (Risk Of Heart Disease) कमी होतो. याव्यतिरिक्त, लठ्ठपणा (Obesity) रोखण्यास फायबर खुप गुणकारी आहे. आहारात दररोज फायबरचे प्रमाण असल्याची खात्री करा.

 

फळांचा चांगला उपयोग (Good Use Of Fruits) : सालांसह फळं आणि भाज्या खा. आपण अनेकदा फळभाज्यांची सालं फेकून देतो. तथापि, संशोधनात असे आढळून आले की, काही फळे आणि भाज्यांच्या (Fruits And Vegetables) सालींमध्ये पोषक आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. सफरचंद, काकडी किंवा बटाटे (Apple, Cucumber Or Potato) वगैरे सोलून न घेता तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. काकडीच्या सालींमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, तर सफरचंद न सोलता खाल्ल्यास त्यातून जास्तीत जास्त पोषक द्रव्ये मिळतात.

पूर्णधान्य खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Whole Grains) : बार्ली, बाजरी, मका इत्यादी संपूर्ण धान्यांचा समावेश करून आपल्याला फायबरसह इतर पोषक द्रव्ये देखील मिळू शकतात. आहारात संपूर्ण धान्याचा समावेश करणे हा मधुमेहींसाठी खुप फायदेशीर असते. ते पचविणे सोपे आहे, तसेच ग्लाइसेमिक इंडेक्स कमी आहे, ज्यामुळे मधुमेहींसाठी हे धान्य खूप उत्कृष्ट आहार बनते.

 

फळातील फायबरचे प्रमाण (Level Of Fiber In The Fruit) : शरीरासाठी आवश्यक असणार्‍या इतर
पोषक घटकांबरोबरच अनेक फळांमध्येही फायबरचं प्रमाण चांगलं आढळतं.
१०० ग्रॅम सफरचंदांमध्ये २.४ ग्रॅम, किवीज ३ ग्रॅम, संत्री २.८ ग्रॅम, केळी २.६ ग्रॅम
आणि एवोकॅडोमध्ये सर्वाधिक ७ ग्रॅम फायबर असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,
मधुमेहात या फळांचं सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Fiber Benefits In Diabetes | fiber benefits in diabetes good source of dietary fiber

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा