अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

दहीहंडी उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदुषण आणि वाहतूकीला अडथळा आणल्याने पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्यास सांगितल्यानंतरही त्याला विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांनी अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेज मालक, साऊंड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d46dafd-b062-11e8-b81b-73cdd3ff443c’]

अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष सिद्धांत प्रधान, स्टेज मालक राजीवसिंग ठाकूर, साऊंट माल विजय नरुटे अशी गुन्हा दाखल झालेल्या इतरांची नावे आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे.
अरण्येश्वर चौकात दहीहंडी उत्सव मंडळाने विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी स्टेजची रोडवर बांधणी करुन त्यावर कार्यक्रम आयोजित केला होता.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a255b6c9-b062-11e8-b7ae-9909b45dc01f’]

मोठ्या क्षमतेची साऊंड सिस्टिम लावून जाणून बुजून ध्वनी प्रदुषण केले. तसेच रहदारीला अडथळा निर्माण केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना कार्यक्रम बंद सांगितले. त्यांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.आर. पुराणीक करीत आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी