आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचे निवेदन देण्यासाठी आलेल्या दोन कार्यकर्त्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करुन नुकसान केले होते. या प्रकरणी कोरेगांव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हा प्रकार शक्रवारी (दि.२४) दुपारी दीडच्या सुमारास घडला होता.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f8a13e34-a865-11e8-8dd7-c57fe8411859′]

शेखर बंगाळे (रा. सोलापूर) आणि त्याचा साथिदार यांचे विरुद्ध कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी विजय डगळे (वय-५२ रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शेखर बंगाळे आणि त्याचा एक साथिदार काल सर्कीट हाऊसजवळील आदिवासी प्रकल्प कार्यालयात धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी आले होते. या दोघांनी कार्य़ालयात येऊन या ठिकाणी सरकारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच कार्य़ालयातील कपाट आणि खुर्चांची तोडफोड करुन त्यांच्या जवळील पत्रके कार्य़ालयात फेकून कार्य़ालयातील कर्मचाऱ्यांना कार्य़ालयाबाहेर जाण्यास मज्जाव केला. या घटनेत कार्यालयाचे नुकसान झाले असून दोघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अरुण गौड हे करीत आहेत.

इतर बातम्या

डिजिटल इंडियानं पोटं भरणार नाही : उद्धव ठाकरे
कात्रजमध्ये पाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ