#Surgicalstrike2 : पूंछमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार 

पूंछ ( जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पूंछ विभागातील नौशेरा , बालाकोट , मनकोट फॅक्टर याठिकाणी पाकिस्तानी सैन्य जोरदार गोळीबार करत आहेत. भारतीय जवानांकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.  या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सुखोई ३० KM तसेच मिसाईल्स अलर्ट ठेवले आहेत.

कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा, इम्रान खान यांचं पाकिस्तानी नागरिकांना आवाहन – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने आज मोठा कारवाई केली. वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला आहे . सुमारे ३०० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले आहेत.

सर्जिकल स्ट्राइक-२ मुळे पाकिस्तानला मोठी चपराक बसली आहे. त्यामुळे पाकिस्तान धास्तावला आहे. भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीनं पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची बैठक बोलावली. बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लष्कर आणि नागरिकांना कोणत्याही परिस्थितीला समोरं जाण्यासाठी तयार राहा, असा सल्ला दिला आहे. तसेच आता वेळ आणि स्थळ पाकिस्तान ठरवेल ; अशी धमकीही इम्रान खान यांनी भारताला दिली आहे.