Fifa World Cup 2022 | स्पेनचा संघ विश्वचषकाबाहेर पडल्याने प्रशिक्षक एनरिक यांची संघातून हकालपट्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Fifa World Cup 2022 | सध्या कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 सुरू आहे. या स्पर्धेत स्पेनचा संघ सुपर 16 राउंडमधून बाहेर पडला. यानंतर या संघाच्या व्यवस्थापकांनी महत्त्वाचा निर्णय घेत प्रशिक्षक लुईस एनरिक यांची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे. स्पेनने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, परंतु त्यांनी शेवटचा गट सामना गमावला आणि त्यांना सुपर 16 राउंडमधून बाहेर जावे लागले. (Fifa World Cup 2022)

स्पेनच्या फुटबॉल फेडरेशन आरएफईएफने अधिकृत निवेदन जारी करून याची माहिती दिली आहे. 21 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक, लुईस दे ला फुएन्टे हे लुईस एनरिक यांची जागा घेणार आहेत. स्पेनच्या राष्ट्रीय संघाच्या भविष्यासाठी नवीन प्रकल्पावर काम करावे लागणार असून, त्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे स्पेनच्या फुटबॉल फेडरेशन आरएफईएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

स्पेनच्या निराशाजनक पराभवानंतर, लुईसने आपली चूक असल्याचे कबूल केले.
ही फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी लुईस एनरिकच्या संघ निवडीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
त्यांनी आपल्या संघात रामोस, डी गाया, थियागो या खेळाडूंना स्थान दिले नव्हते.

 

Web Title :- Fifa World Cup 2022 | fifa world cup 2022 spain coach enrique was fired- after the team was eliminated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Indrani Balan Winter T-20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच, वालेकर स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!