युती अभेद्य ! ‘फिफ्टी – फिफ्टी’ होणार जागावाटप, पण ‘विद्यमान’ आमदार असलेल्या जागा सोडून

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – महाजानदेश यात्रेच्या निमित्ताने नागपूरमध्ये पोहोचलेल्या नितीन गडकरी यांनी शिवसेना आणि भाजप युतीवर भाष्य केले. युतीविषयी बोलताना त्यांनी म्हटले कि, विद्यमान जागा सोडून इतर जागांची अर्धी अर्धी वाटणी केली जाणार असल्याचे म्हटले. सध्या भाजप आणि शिवसेनेकडे प्रत्येकी १२२ आणि ६३ आमदार आहेत. त्यामुळे १८५ जागा सोडल्या तर उर्वरित १०३ जागांवर आम्ही समान वाटणी करणार असून मित्रपक्षांना देखील भाजपच्या कोट्यातून जागा द्यायच्या असल्याने भाजपकडे कमी जागा होणार आहेत. त्याचबरोबर आमचं सगळं ठरलंय असेदेखील त्यांनी म्हटले. मात्र काय ठरलय हे वेळ आल्यावरच माध्यमांना कळेल असेदेखील यांनी म्हटले.

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले कि, काही ठिकाणी युती तोडण्याची मागणी होत आहे, मात्र आम्ही ती अजिबात तोडणार नसून मित्रपक्षांना सोडून आम्ही अजिबात सरकार चालवणार नाही. राजकारणात बदलता येत नसते. त्यामुळे आम्ही शिवसेनेला सोबत घेऊनच हि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर विरोधकांवर टीका करताना म्हटले कि, त्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित करण्याऐवजी आपल्या पराभवाचे विश्लेषण करावे तसेच स्वतःमधील कमी दूर करावी. त्याचबरोबर इव्हीएमवर शंका उपस्थित करून विरोधक मतदारांवर देखील अविश्वास दाखवत आहेत. त्यांनी आगोदर आपण जनतेपासून दूर का गेलो याची समीक्षा करायला हवी. त्याचबरोबर या निवडणुकीत विरोधकांचा महापराभव होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही परिस्थितीत युती तुटणार नाही

शिवसेना आणि भाजप युतीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले कि, एकटे भाजप स्वबळावर लढले तरी आम्ही १५० पेक्षा जास्त जागा जिंकू, मात्र आम्ही यामुळे युती तोडणार नसून थोडेफार नुकसान सहन करून कोणत्याही परिस्थितीत युती हि होणारच आल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

आरोग्यविषयक वृत्त –