Fig For Weight Gain | वजन वाढवण्यासाठी अंजीरसोबत या 5 गोष्टीं मिसळून करा सेवन, आजारांपासून दूर राहील शरीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fig For Weight Gain | वजन कमी करण्यासाठी आपण अनेक युक्ती अवलंबतो, परंतु वजन वाढविण्याचा विचार फार कमी लोक करतात. जे लोक किरकोळ देहयष्टीचे आहेत, ते वारंवार वजन कसे वाढवायचे याचा विचार करत असतात. ते आपल्या आहारात अशा अनेक गोष्टींचा समावेश करतात, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते. जर तुम्हालाही वजन वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करू शकता. (Fig For Weight Gain)

 

अंजीर हे असे फळ आहे जे कच्चे आणि सुकलेले दोन्ही प्रकारे खाऊ शकता. पोटॅशियम, मिलनरल, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांचे गुणधर्म अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. अशा स्थितीत वजन वाढवण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींसोबत अंजीर खाऊ शकता. (Fig For Weight Gain)

 

1. अंजीर आणि मनुका (Figs and Raisins)
दोन्हीमध्ये हेल्दी फॅट असते. वजन वाढवण्यासाठी तुम्ही 10 मनुके आणि 5 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी खाऊ शकता. याचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढेल आणि तुम्हाला बारीक होण्याची तक्रार राहणार नाही.

2. अंजीर आणि दूध (Figs and Milk)
दुधात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. अंजीर आणि दूध एकत्र सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. वजन वाढवण्यासाठी तुम्ही अंजीर आणि दूध एकत्रही सेवन करू शकता. हे शरीराचे वजन वाढवण्यास मदत करते आणि हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते.

3. ओट्स, दूध आणि अंजीर (Oats, Milk and Figs)
ओट्स हे पोषक तत्वांचा खजिना आहे. जरी ओट्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होत असली, तरी तुम्ही जलद वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ओट्समध्ये दूध आणि अंजीरचे छोटे तुकडे घालून नाश्त्यात सेवन करू शकता. असे केल्याने तुमचे वजन वाढेल.

 

4. अंजीर हलवा (Fig)
जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात अंजीर हलव्याचा समावेश करू शकता.
अंजीराचा हलवा चव आणि आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे. याच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते. तसेच हिवाळ्यात शरीर निरोगी राहते. (Fig For Weight Gain)

 

5. अंजीर आणि खजूर (Figs and Dates)
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिवाळ्यात खजूर जरूर खावे. खजूरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.
जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्ही अंजीर आणि खजूर मिल्क शेक किंवा अंजीर आणि खजूरचा हलवा खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Fig For Weight Gain | for weight gain consume these things with figs body will stay away from diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे लाभदायक

Weight Loss Drink | वजन कंट्रोल करते नारळ पाणी, जाणून घ्या आरोग्याला कसा होता फायदा

Problem Of White Discharge | व्हाईट डिस्चार्जने त्रस्त असाल तर ‘या’ 5 आयुर्वेदिक उपायांनी करा उपचार