Video : ‘कोरोना’विरुद्धचा लढा अजून सुरूच, शरद पवार म्हणतात – ‘हा’ व्हिडीओ पहाच !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वांनी कोरोनापासून सावधानता बाळगावी यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सरपंचांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेकजण कोरोना संदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अचूक माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सतत ट्विटरवरून कोरोनाची जनजागृती केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आपली कोरोना विरूद्धची लढाई अद्याप सुरूच आहे असं पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे.
देशातील जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid_19 विरुद्धचा लढा अजून सुरू आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO ने तयार केला आहे. अवश्य पाहा.#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी pic.twitter.com/RBTX39x7ZJ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2020
शरद पवार यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सर्वांनी हा व्हिडीओ पहावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “देशातील जनजीवन टप्प्याटप्प्यानं पूर्वपदावर येत आहे. तरीही आपला #Covid-19 विरुद्धचा लढा अजून सुरूच आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानं योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. हाच संदेश देणारा व्हिडीओ @WHO नं तयार केला आहे. अवश्य पहा” असं पवारांनी म्हटलं आहे. माझे कुटंब माझी जबाबदारी असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
बाजारात किंवा समाजात वावरताना कशी काळजी घ्यायची हेच या व्हिडीओतून सांगण्यात आलं आहे. बिंधास्तपणा हा धोकदायक ठरण्याची शक्यता आहे.