पुणे : बाजार समितीच्या प्रशासक आणि सल्लागारामध्ये हाणामारी

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीत केलेल्या कामाचे बील मागायला गेलेल्या तांत्रिक सल्लागारास बाजार समितीच्या प्रशासकांसह कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1c1a09b-c277-11e8-9014-0132259cb99c’]

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अद्यायावत असा नविन पुृलबाजार उभारला जात आहे. पुलबाजारातील गाळ्यांचे मुल्यांकन करण्याचे काम एका तांत्रिक सल्लागाराला देण्यात आले होते. संबंधित सल्लागाराने त्याबाबतचा अहवाल बाजार समिती प्रशासनाकडे सादर केला होता. त्या कामाच्या बदल्यात ठरलेल्या रकमेपैकी काही रक्कम बाजार समितीने संबंधित सल्लागारास दिली होती. शिल्लक रक्कम बाजार समिती सल्लागारास देऊ लागत होती. ती रक्कम मागण्यासाठी संबंधित सल्लागार बुधावारी दुपारच्या सुमारास बाजार समितीच्या प्रशासकांच्या दालनात गेले होते. त्यावेळी प्रशासक आणि सल्लागार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूपांतर मारहाणीत होऊन संबंधित सल्लागारास जबर मारहाण झाल्याची माहिती आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6b5541d-c277-11e8-ad95-6f89627ae631′]

दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा बाजार समिती प्रशासन आणि संबंधित सल्लागार स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली. परंतु आजही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. मारहाण झाल्यानंतर संबंधिताला तक्रार देऊ नये यासाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा मंडई वर्तुळात चर्चा आहे.