नगर : मुलाखतीसाठी आलेल्या ‘इच्छूक’ भाजप कार्यकार्त्यांमध्ये ‘राडा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. भाजपच्या वतीने आज विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखीती घेण्यात येत आहे. या मुलाखती दरम्यान दोन इच्छुक उमेदवारांच्या कार्य़कर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पहायला मिळाले. निवडणुकीपूर्वीच कार्य़कर्त्यांमध्ये वाद झाल्याने निवडणुकीदरम्यान वातावरण चिघळणार अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

अहमदनगरला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी उशिरा मुलाखती सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत या मुलाखती चालू आहेत. मात्र, संध्याकाळी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या आधी नगर शहरातील दोन कार्यकर्त्यांमध्ये चांगले झोंबाझोंबी झाली.

दोन्ही कार्यकर्ते भाजपच्या दोन गटाचे असून उपस्थितांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र सुसंस्कृत असणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथेच झोंबाझोंबी करतात शिवीगाळ केल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. मात्र, आता निवडणुकीच्या आधीच कार्यकर्त्यांमध्ये झोंबाझोंबी होत असेल तर निवडणुकीमध्ये काय होणार हा प्रश्न आता समोर येतोय.

आरोग्यविषयक वृत्त –