चेष्टामस्करीतून दोन मित्रांमध्ये वाद, एकावर चाकूने वार

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

दोन मित्रांमध्ये सुरु असलेली चेष्टामस्करी एका मित्राच्या चांगलीच अंगलट आली. चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१०) दुपारी एकच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’45158afb-ce08-11e8-bd29-036484140d90′]

शहादाब उर्फ सद्दाम अन्सारी (वय-२९ रा. आनंद पार्क, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सचिन मच्छिंद्र मान (वय-२१ रा. गुरुदत्त हाईट, मांडरी बुद्रुक) हा जखमी झाला असून त्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी हे दोघे मित्र आहेत. बुधवारी ते कल्याणीनगर येथील एबीसी बार अॅन्ड रेस्टॉरंटच्या मेन गेट समोर उभे होते. त्यावेळी दोघामध्ये चेष्टामस्करी सुरु होती. त्यावेळी आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी सचिन याच्यावर चाकूने वार केले. आरोपीने सचिनच्या कानावर वार करुन त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेत सचिन मान हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

थुंकल्याच्या कारणावरुन एकावर कोयत्याने वार

पुणे  :  पेट्रोल भरून निघालेल्या दुचाकीस्वाराला थुंकल्याच्या कारणावरुन तिनजणांनी कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.१०) रात्री सव्वा दहाच्या सुमारास पुना हॉस्पिटल पुलावर घडली. याप्रकरणी रविंद्र मधुकर जाधव (वय-३४ गुरुजन सोसायटी शास्त्रीनगर कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र जाधव हे दुचाकीमध्ये पेट्रोल भरुन पुना हॉस्पिटल पुलावरुन जात होते. दुचाकीवरुन जात असताना थुंकल्याच्या कराणावरुन आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन त्यांची दुचाकी आडवली. रविंद्र जाधव यांना तिघांनी शिवीगाळ करुन कोयत्याने वार केले. तसेच त्यांच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले. पुढील तपास डेक्कन पोलीस करित आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00ea1b57-ce09-11e8-92d9-93254a36f7bd’]