भांडणातून तरुणाचा डोळा फोडला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – संत तुकारामनगर येथे पूर्वीच्या भांडणातून चौघांनी एका तरुणाला मारहाण करत डोळा फोडल्याची घटना घडली.

या प्रकरणी तौसिफ इकबाल खान (२८, रा. वल्लभनगर, पिंपरी) याने फिर्याद दिली आहे. तर रोहित मोटे (१९, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ़ आणि रोहित यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून रोहित याने त्याच्या तीन साथीदारांसह येऊन तौसिफ़ यांच्या वाहनाला वाहन आडवे लावले. त्यावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यातूनच रोहित आणि त्याच्या साथीदारांनी तौसिफ़ याना चामडी बेल्टने मारहाण केली. यामध्ये तौसिफ़ यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डावा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like