रिक्षाचालक व साथीदारांकडून पोलिसाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नो एन्ट्री असताना पुलावरून रिक्षाचालकाला थांबण्याचा इशारा केल्यानंतर पोलिसांना हुलकावणी देऊन कर्वे रोडने पळून जात होता. यानंतर पोलिसांनी त्याला रस्त्यात थांबविल्यावर त्याने व त्याच्या रिक्षातील साथीदारांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना कर्वे रोडवर बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकऱणी डेक्कन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दत्ता शिवराम हावळे (३६), सुशील सुर्यकांत सर्वैगौडा (३३), बाळू बळी पारवे (२१), अजय अशोक सर्वेगौड (२५, सर्व पाटील इस्टेट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस नाईक शिंदे यांनीं फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे पुना हॉस्पीटल येथील पुलावर वाहतुक नियमन करत होते. येथील पुलावरून तीनचाकी व चारचाकी वाहनांना येण्यास बंदी आहे. मात्र तरीही रिक्षा क्र, एमएच १२ क्यु आर २५९५ तेथून जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी त्याने न थांबता कर्वे रोडच्या दिशेने रिक्षा वळविली. त्यानंतर त्यांनी पाठलाग करून त्याला थांबविले. तेव्हा रिक्षाचालक व त्याच्या इतर साथीदारांनी त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना डेकक्न पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.