शरद पवारांनी केली राज्यपालांची PM मोदी यांच्याकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्व राज्य सरकारं कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी झुंजत असताना काही राज्यांत राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना परस्पर आदेश दिले जात आहेत. त्यामुळे समन्वय राखण्यात अचडणी येऊ शकतात. केंद्र सरकारनं याबाबत योग्य ती काळजी घ्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

कोरोना आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फनन्सिंगद्वारे संवाद साधला. शरद पवारही या बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी पवारांनी अनेक मद्यांवर आपले मत मांडताना राज्यपालांच्या कार्यपद्धतीविषयी काहीशी नाराजी व्यक्त केली. काही राज्यांमध्ये माननीय राज्यपालांकडून कार्यकारी वर्गाला थेट सूचना दिल्या जात आहेत. राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांना आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत.

मात्र, मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत त्यांनी ते अधिकार वापरल्यास अधिक योग्य राहिल. त्यामुळे राज्यात दोन सत्ताकेंद्र होणार नाहीत. तसंच. समन्वयामध्ये त्रुटी राहणार नाहीत, असे पवार यांनी म्हटले.

कोरोनामुळे शेती, उद्योग, व्यावसाय क्षेत्र अडचणीत आलेले आहेत. शेतांमध्ये रब्बीचे पीक तयार आहे. परंतु फळ, फुलं, भाजीपाला यांची साठवणूक- विक्री याबाबत प्रत्येक बाबतीत अडचणी निर्माण झाल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलावीत. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारचे उत्पन्न कसे वाढेल याकडे देखील लक्ष पुरवावे. जीएसटी करता राज्यांचा वाटा अद्याप राज्याला मिळालेला नाही. अशा राज्यांकडे तो तातडीने वर्ग करावा, असेही शरद पवार यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like