पिस्तूल दाखवून दुकानाची तोडफोड, मारहाण ; गुन्हा मागे घेण्यासाठी दहशत, शहरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे, असे म्हणून तीन ते चार बुरखाधारी व्यक्तींनी पाईपलाईन रोडवरील दुकानातून येऊन दहशत निर्माण केली. पिस्तूल दाखवून दुकानाच्या काचा फोडून दोन महिला व पुरुषास मारहाण केली. आज रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

आज रात्री पाईपलाईन रोडवरील परी कलेक्शन या दुकानात काही बुरखाधारी व्यक्ती आले. त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेली केस मागे घे, असे म्हणून दुकानातील महिला व पुरुषांनाा मारहाण करून पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच दुकानाच्या काचा फोडून नुकसान केले.

दुकानातील एका महिलेने काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एका मटका बुकी विरोधात तक्रार दिली होती. त्याच कारणावरून ही मारहाण झाल्याचे महिलेने सांगितले आहे. यावेळी एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्नही केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –