Pune : शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात 2 महिला कर्मचार्‍यांमध्ये हाणामारी, प्रचंड खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात आता तरुणांच्या हाणामाऱ्या होत असताना पोलीस विभाग पण फ्री स्टाईल हाणामारीला मागे नसल्याचे दिसत असून, गेल्याच आठवड्यात सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांत हाणामारी झाल्याचे प्रकरण ताजे असताना आज शिवाजीनगर मुख्यालयात दोन महिला कर्मचाऱ्यांतच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ड्युटी ऑफिसर मदतनीस पोलीस शिपाई महिला कर्मचारीने पोलीस नाईक महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली आहे. विशेष म्हणजे, जखमी झालेल्या पोलिस नाईक महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना, संबंधित पोलीस नाईक महिला ड्युटी ऑफिसर आहे. ती आज सकाळी मदतीनीस महिला शिपायाकडे गेली होती. ड्युटीसंदर्भात दोघींत शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळमध्ये झाले. यानंतर वाद थेट मारहाणीवर आले. त्यामध्ये ड्युटी ऑफिसर मदतनीस असलेल्या महिला पोलीस शिपायाने नाईक पदावर कार्यरत असलेल्या महिलेवर हात उचलला आणि हाणामारीला सुरुवात झाली. आरडा-ओरड अन शिवीगाळ होत असल्याने मुख्यालयात एकच खळबळ उडाली. सर्व कर्मचारी दाखल झाले. यानंतर काहींनी हे वाद सोडवले. पण मारहाणीत पोलिस नाईक जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत विचारले असता पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले की, महिलांमध्ये झालेल्या मारहाणीची खात्यातंर्गत चौकशी करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. पोलिस मुख्यालयात विविध कामांसाठी हात ओले करावे लागतात. ड्युटी ऑफिसर मदतीस असलेल्या महिला पोलिस शिपायांकडून देखील तोडपाणी होत असल्याची चर्चा आहे. त्या देवाण-घेवाणीतून मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like