पैश्यासाठी डोक्यात मारला रॉड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्पेवस्ती, नाणेकरवाडी येथे पैशाच्या वादातून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करण्यात आले.

या प्रकरणी दिलू कृष्णचंद्र दलाई (२२, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) याने फिर्याद दिली असून तो जखमी झाला आहे. ईश्वर भरत साहू (३०, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलू आणि ईश्वर या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून भांडण झाले. त्यावेळी ईश्वर याने दिलू याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. यामध्ये दिलू गंभीर जखमी झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

न्यायालयाजवळ गोळीबार प्रकरण : रावण गॅंगचे दोघे गजाआड

अहमदनगर : प्रदीप टाक खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

 

Loading...
You might also like