चाकण मधील कंपनीसमोर २ गटात राडा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चाकण एमआयडीसी मधील विन्डसस्ट्राँग कंपनीत सुरु असलेली भांडण पाहयला गेल्याने दोन गटात राडा झाला. ही  मंगळवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यामध्ये तीन जण जखमी झाले असून चाकण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमोल अशोक इंगोले (२६, सध्या रा स्वामी समर्थ बिल्डिग, दावडमळा ,चाकण, ता. खेड, मुळ रा. टाकळी, जि नांदेड) आणि विरबाजी उर्फ बाजी बाबा चव्हाण (२२) या दोघानी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. विजय इंगोले, अमोल अशोक इंगोले व विरबाजी उर्फ बाजी बाबा चव्हाण अशी यामध्ये जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

अमोल याने दिलेल्या तक्रारी वरून विरबाजी बाबा चव्हाण (रा. दावडमळा , चाकण), अक्षय खरमारे (रा आंबेठाण चौक, चाकण), अक्षय पाचपुते (रा. आंबेठाण चौक चाकण ) व गणेश शिंदे (पुर्ण पत्ता माहीत नाही ) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

तर विरबाजी उर्फ बाजी चव्हाण याच्या तक्रारीवरून अमोल अशोक इंगोले, अशोक इंगोले, नितीन उटकर ( तिघेही रा. दावडमळा, चाकण, ता .खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराबवाडी (ता. खेड) येथील विन्डसस्ट्राँग कंपनीसमोर किरकोळ भांडणातून रात्रीच्या वेळी ही तुंबळ हाणामारी करत राडा घातला. लोखंडी चाकूने वार करुन जखमी केले आहे. यामध्ये चार जणाना अटक केली आहे. तपास चाकण पोलीस करीत आहेत.