Figs Benefits | अंजीर खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन टीम : सगळ्या क्षेत्रांमध्ये माणूस प्रगती करत चालला आहे. परंतू याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत आहे. (Figs Benefits) वातावरणातील शुद्धता कमी होत असल्यामुळे आपल्याला अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. यासगळ्यामध्ये आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला पोषक आहारही घेतला पाहिजे. (Figs Benefits) तर अनेकांना अंजीर हे फळ माहित असेलच, परंतू आपल्या आरोग्याला त्याचे नेमके कोणते फायदे मिळतात हे माहित आहे का? नसेल माहित तर काळजी करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला त्याचविषयी सांगणार आहोत (Health Benefits Of Fig).

 

-बद्धकोष्ठता दूर होते (Constipation)

अंजीराच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते. अंजीरमध्ये फायबर (Fiber) चांगल्या प्रमाणात आढळते. अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा. असे केल्याने पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील (Figs Benefits).

 

-साखरेची पातळी नियंत्रित ठेवते (Controls Sugar Level)

अंजीरमध्ये भरपूर पोटॅशियम (Potassium) असते, जे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अंजीरमध्ये असलेले क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते, असे अनेक अभ्यासात आढळून आले आहे. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने टाईप-2 मधुमेहामध्येही (Type-2 Diabetes) रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते. सॅलड्स, स्मूदीज, कॉर्नफ्लेक्स बाऊल्स किंवा ओट्समध्ये अंजीर घालून तुम्ही हे सुकामेवा तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

 

-खनिजे (Minerals)

अंजीरमध्ये मॅंगनीज, झिंक (Zinc), मॅग्नेशियम (Magnesium) आणि लोह (Iron) यासारखी खनिजे अधिक प्रमाणात असतात. हे प्रजनन आरोग्यासाठी खूप चांगले आहे. या ड्रायफ्रूटमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. त्यामुळे पीएमएसचा त्रास असलेल्या महिलांना अंजीर खाण्याचा सल्लाही दिला जातो.

-वजन कमी करण्यास उपयुक्त (Useful For Weight Loss)

तांबे, मॅग्नेशियम असे अनेक पोषक तत्व अंजीरमध्ये आढळतात. त्यांच्या मदतीने तुमचे चयापचय व्यवस्थित राहते. अंजीर तुमच्या कॅलरीजचे प्रमाणही नियंत्रित करते. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजनही कमी होते.

 

-हाडे मजबूत राहतात (Bones Stay Strong)

कॅल्शियमचा चांगला डोस घेतल्याने तुमची हाडे निरोगी राहतात. आपले शरीर स्वतःहून कॅल्शियम तयार करत नाही.
त्यामुळे आपल्याला सोयाबिन, दूध (Milk), हिरव्या पालेभाज्या (Green Vegetable),
अंजीर यासारख्या बाह्य स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. अंजीराच्या सेवनाने आपली हाडे मजबूत होतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Figs Benefits | health benefits of eating figs every morning on an empty stomach

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा