Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसमुळं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा लपवतंय चीन, खुपच भयानक आहे ‘वास्तव’

बिजिंग : वृत्तसंस्था – चीनच्या एका कंपनीचा दावा आहे की कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृतांचा आकडा चीन सरकार लपवत आहे. चीनच्या या कंपनीने जारी केलेल्या आकड्यामुळे ही शंका निर्माण झाली आहे. या कंपनीने कम्युनिस्ट देशात कोरोनामुळे आतापर्यंत 25,000 च्या जवळपास मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. असे म्हटले जात आहे की कंपनीने हे सत्य चुकीने उघड केले. तर सरकारचे अधिकृत आकडे काही वेगळेच सांगत आहेत. तैवान न्यूज रिपोर्टनुसार चीनची दुसरी सर्वात मोठी टेक कंपनी टेन्सेंटकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांमध्ये 24,589 रूग्ण मृत झाल्याचे म्हटले होते.

या व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 1,54,023 सांगण्यात आली आहे. ही संख्या शनिवारी जारी करण्यात आली. यावरून अंदाज लावता येतो की, मागील 4 दिवसात ही संख्या किती वाढली आहे. परंतु, कंपनीने काही वेळानंतर आपल्या सिच्युएशन ट्रॅकर पेजला अपडेट करत ही संख्या सरकारकडून जारी करण्यात आलेल्या डिटेल्सनुसार केली आहे. मात्र, तोपर्यंत कंपनीच्या जुन्या डाटाचा स्क्रीनशॉट घेतला गेला होता. सध्या ही संख्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, चूक लक्षात आल्यानंतर टेन्सेंटने आपल्या पेजवर सरकारी माहिती जारी केली.

नव्या आकड्यांमध्ये कंपनीने 14,446 लोकांना लागण झाल्याचे आणि 304 मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. सरकारी संख्येपेक्षा वेगळी संख्या केवळ टेन्सेंटनेच जारी केलेली नसून अन्य अनेक स्त्रोतांनीही लागण झालेल्या रूग्णांची संख्या 79,808 असल्याचे म्हटले आहे. ही संख्या सरकारच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा तीनपट जास्त आहे.

अनेक पत्रकार चीनच्या कम्युनिस्ट पार्टीवर कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या मृतांचा आकडा लपवण्याचा आरोप करत आहेत. एवढेच नव्हे, मेडिकल सर्व्हिस देणार्‍या संस्थांवर देखील खरी माहिती न देण्यासाठी सरकार दबाव आणत आहे. व्यापारावर परिणाम होण्याच्या भितीने चीनने ही माहिती जगापर्यंत न जाऊ देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.