Mumbai News : भोंदूबाबानं मुलीवर केले लैंगिक अत्याचार, तक्रार करणाऱ्या आईनं दिली खोटी साक्ष, पुढं झालं असं काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या आईनं आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्याच आईविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?
एक महिला आपल्या दोन मुलींसह कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात होती. पतीनं सोडल्यानं आणि त्यातही हालाखीची परिस्थिती असल्यानं मिळेल ते काम करून ती महिला घर चालवत होती. त्यात मोठी मुलगी मानसिकरित्या कमकुवत होती. महिलेच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीकडे ती बरी व्हावी यासाठी तिच्यावर उपचार सुरू केले. आपल्याकडे दैवी शक्ती असून आपण त्या मुलीला ठीक करू असं त्यानं सांगितलं. पूजा अर्चा करण्याच्या बहाण्यानं तो भोंदूबाबा रोज त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करू लागला. अनेक दिवस असं सुरू होतं. एक दिवस त्या मुलीनं भोंदूबाबाकडे जायला नकार दिला. याबाबत तिच्या आईन विचारणा केल्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मुलीच्या आईला सर्व प्रकार कळाला आहे त्यामुळं आता आपलं काही खरं नाही हे लक्षात आल्यानंतर भोंदूबाबा कर्नाटकला पळून गेला. काही महिन उलटूनही आपल्या विरोधात काही तक्रार दाखल झालेली नाही हे पाहून तो परत आला आणि आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली. यानंतर त्यानंतर तो महिलेला धमकवायला लागला. जर महिलेनं आणि तिच्या मुलीनं आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तंत्रमंत्राचा वापर करून तिचत्या कुटुंबासह नातेवाईकांना देखील संपवून टाकेल अशी धमकीही त्यानं दिली. शेवटी त्या बाबाच्या धमक्यांना कंटाळून त्या आईनं पोलीस स्टेशन आणि राजकीय नेत्यांचा दरवाजा ठोठावला. नंतर त्या बाबाला गजाआड केलं.

आईनं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सर्व वस्तूजन्य, वैद्यकीय आणि तांत्रिक पुराव्यावर आधारीत न्यायालयात खटला सुरू केला. परंतु खटला सुरू होताच तक्रारदार आईनं तिची साक्ष फिरवली. माझी मुलगी घाबरली होती. तिचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं सांगून तिनं केलेल्या तक्रारीच्या विरोधात साक्ष दिली. हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांसह न्यायालयालाही धक्का बसला. पंरतु आरोपी भोंदूबाबानं पूजा अर्चा करण्याच्या बहाण्यानं त्या आईच्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केले हे पोलीस तपासात सिद्ध झालं होतं. पोलिसांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केलं होतं. त्यामुळं आरोपी भोंदूबाबाला न्यायालयानं 12 वर्षांची शिक्षा सुनावली आणि खोटी साक्ष दिली म्हणून आई विरोधात कुरार पोलिसांना गु्हा दाखल करण्यास सांगू त्या महिलेवरिोधात न्यायालय खटला सुरू करणार आहे.

दिंडोशी सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार, नुकताच त्या महिलेविरोधात सहायक प्रबंधकांच्या तक्रारीवरून कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी साक्ष देणाऱ्या त्या आईविरोधात भादंवि कलम 181 (शपथ घेऊन खोटी साक्ष देणं), 193 (खोट्या पुराव्यांबाबत शिक्षा), 199 (ग्राह्य धरलेल्या पुराव्यात खोटे कथन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.