भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करा : संभाजी ब्रिगेड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च असून संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मात्र दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर ‘गणपती’ ची स्थापना केली आहे. हे निषेध आर्य आहे. राज्यघटनेप्रमाणे संविधान व भारत धर्मनिरपेक्ष आहे. धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही, कायने सुद्धा ते चुकीचे आहे. असे असताना संविधान गणपतीचा पाठ समजून श्री. तरडे यांनी भारतीय संविधानाचा वापर केला आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवीण तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

संविधान धर्मग्रंथ नाही. संविधानाचा अर्थ कदाचित प्रवीण तरडे यांना माहित नसावा असेच दिसते. कदाचित त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ संस्कार असल्यामुळे कदाचित त्यांनी अशा पद्धतीने बदनामी केली असेल. दिल्लीमध्ये भारतीय संविधान जाळणाऱ्या आणि गणपतीखाली ‘पाठ’ समजून भारतीय राज्यघटना ठेवणाऱ्या दोघांमध्ये कुठलाही फरक नाही. ही देशद्रोही कृती आहेत. म्हणून लोकशाहीत कायद्याद्वारे प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

भारतीय म्हणून आमच्या भावना तीव्र आहेत. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, भोर तालुका अध्यक्ष गणेश चऱ्हाटे, महादेव मातेरे, पंढरीनाथ सोंडकर, संघटक बी आर गायकवाड, सुमित गायकवाड, आकाश धुमाळ, ओंकार यादव, शरद बचाटे आदी उपस्थित होते.