इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आणखी ‘वाढ’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आपल्या किर्तनातून सामाजिक प्रबोधन करतात, त्यांच्या किर्तनाला लाखो नागरिक आणि महिला उपस्थित असतात. मंगळवारी झालेल्या त्यांच्या किर्तनामध्ये त्यांनी सम – विषमच्या सल्ल्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चाचणी कायद्याचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुरुवारी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

अविनाश पाटील यांनी सांगितले की, कीर्तन करताना चेष्टा, मस्करी, विनोद करणारे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यात विकृतीची लक्षण दिसतात. त्यांच्या किर्तनाची ध्वनिचित्रफीत युट्यूबवर अपलोड करण्यात आली आहे. त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी दिलेला संदेश आहे. त्यांनी केलेले वक्तव्य संविधानाविरोधी आणि अशास्त्रीय आहे. त्यांचे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन असून त्यांच्या किर्तनातून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी वक्तव्ये दिसून येतात. ते महिलांची अवहेलना व द्वेष करतात, असे अविनाश पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते इंदूरीकर ?
इंदूरीकर महाराज यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनाच्या कार्यक्रमात सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे विधान केले होते. त्यांचे हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे, हे विधान म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला आहे.

इंदूरीकर यांना नोटीस
पीसीपीएनडीटीच्या सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवली आहे. इंदुरीकर महाराजांनी केलेल्या विधानाप्रकरणी खुलासा मागवण्यात आला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पीसीपीएनडीटीच्या सदस्यांनी म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like