मसाज शिकविण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग, पुण्यातील डॉक्टरवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मसाज (Massage) शिकवण्याच्या बहाण्याने एका महिलेचा विनयभंग (Molested) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune) उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद (FIR) दिली असून तिच्या फिर्यादेवरन अलंकार पोलिसांनी एका 48 वर्षीय डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरचा कर्वेनगरमध्ये आयुर्वेदिक दवाखाना आहे.

याप्रकरणी एका 57 वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कर्वेनगर येथील दवाखान्यात शुक्रवारी (दि.18) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ही महिला या डॉक्टरकडे कामासाठी विचारणा करण्यासाठी गेली होती. तेव्हा डॉक्टरने मसाज करता येते का अशी विचारणा केली. फिर्यादी यांना मसाज करण्यासाठी शिकवतो, असे म्हणून मसाज शिकवण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगास वाईट भावनेने स्पर्श केला. तसेच ड्रॉवरमधील पैसे दाखवून दुपारी दीड वाजता येता का असे विचारुन विनयभंग केला. पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.