भारतीय राज्य घटनेविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मनोहर भिडेंवर गुन्हा दाखल करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्य घटनेचा संबंध मनुस्मृती या ग्रंथाशी जोडणाऱ्या मनोहर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महारष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती जमाती विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. वाघमारे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2cd9e4d-8b56-11e8-b99f-e301f86fe6da’]

मनोहर भिडे यांनी सोमवारी (दि. १६) एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत आक्षेपार्ह विधान केले होते. या मुलाखतीमध्ये भिडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय राज्यघटेनेचा संबंध मनुस्मुती या गंथाशी जोडून जातीजाती मधील भेदभाव, स्त्री पुरुष असमानता, दलित वर्गाला वाईट वागणूक कशी द्यावी याचा उल्लेख केला. या गोष्टी भारतीय राज्य घटनेच्या धोरणांच्या विरुद्ध आहेत.

असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राज्य घटनेचा संबंध मनुस्मुर्ती या ग्रंथाशी जोडून मनोहर भिडे यांनी अपमान केला आहे. तसेच समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन एकमेकाविरुद्ध व देशा विरुद्ध भावना भडकवण्याचे काम मनोहर भिडे यांनी केले आहे असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणिची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पाठवली आहे.