इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकूनही करू नका या चुका

मुंबई : वृत्तसंस्था – आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आयटी रिटर्न भरण्याचे फॉर्मही आणलेत. फॉर्म ITR १ आणि ४ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवरुन डाऊनलोड करता येईल. तुम्ही स्वत:च ITR भरणार असाल तर काही चुका टाळाव्या लागतील. नाही तर मोठा दंड पडू शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करताना तुम्ही तुमच्या मिळकतीची खरी माहिती दिली नाही तर तुम्हाला नोटिस मिळू शकते. ITR फॉर्ममध्ये सेव्हिंग अकाऊंट, एफडी आणि इतर गुंतवणुकींची खरी माहिती भरा. यात काही चूक झाली तर ती कर चोरी मानली जाईल.

तुम्हाला हे नसेल की रिटर्न भरताना त्यात मोबाइल नंबर, ईमेल, बँक डिटेल्स आणि पॅन कार्ड चुकीचे भरले तरी आयटी डिपार्टमेंटकडून नोटिस येऊ शकते. तुम्ही चुकीचा फॉर्म भरलात तरी अडचणी येऊ येऊशकतात. तुम्हाला तुमच्या मिळकतीप्रमाणे फॉर्म भरावा लागेल. ज्या व्यक्तींची मिळकतीचे स्त्रोत एकच आहे आणि मिळकत ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी ITR १ फॉर्म भरायला पाहिजे. तुमची मिळकत वर्षाला ५० लाखापेक्षा जास्त असले तर ITR २ फॉर्म भरला पाहिजे. ITR ३ फॉर्म HUF म्हणजे हिंदू एकत्र कुटुंब. त्यात पगार, व्यवसाय, हाऊस प्रॉपर्टी आणि इतर मिळकत यांचा समावेश असतो.

काही जण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना पूर्ण पगार दाखवत नाहीत. तुम्ही असे केले तर अडचणीत याल. बँकेत मिळणारे व्याजही तुम्हाला दाखवावे लागेल. रिर्टर्न भरायची वेळ पाळणे आवश्यक आहे. ITR ने दिलेली डेडलाइनच्या आत आपले फॉर्म जमा करा.

You might also like