लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ! रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार

शिक्रापुर : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही यश इंन चौक कारेगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून एकटीच राहत आहे. पीडित महिलेचे सन २००७ मध्ये लग्न झाले होते पीडित महिलेचे नवऱ्यासोबत पटत नसल्याने तिने घटस्फोट घेऊन कारेगाव येथे राहत होती तिला तिच्या पतीपासून बारा वर्षांचा मुलगा असून आईवडिलांकडे सांभाळण्यासाठी असतो.पीडित महिला रांजणगाव एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून काम करत असताना तिची ओळख योगेश गणपत शिंगोटे(वय २७ वर्षे,सध्या रा. रांजणगाव गणपती, ता.शिरुर,जि. पुणे,मूळ-बदगी बेल्हापूर, ता.अकोले,जि. अहमदनगर) झाली.

या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात होत गेले.प्रेम झाल्यानंतर योगेश याने पीडित महिलेला ‘मी तुझ्याशी लग्न करतो’ असे वारंवार म्हणत लग्नाचे आमिष दाखवले व शिक्रापूर येथील पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग करत बलात्कार केला.पुढे आरोपी योगेश वेळोवेळी पीडित महिलेच्या घरी येऊन तिच्यावर बलात्कार करत होता,परंतु महिलेने लग्नाची विचारणा करत असत तेव्हा आरोपी हा टाळाटाळ करत होता.दि.१९/०४/२०२१ या दिवशी आरोपी योगेश हा पीडित महिलेच्या घरी आला व तिच्या सोबत ईच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले असता पीडित महिलेने लग्नाची विचारणा केली असता आरोपी योगेश याने महिलेला शिवीगाळ,मारहाण केली केली. ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही व जर कुणाला काही सांगितले तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल आणि तुझ्या नावाने चिट्ठी लिहिलं ‘ असे म्हणत त्याठिकाणाहून निघून गेला.यामुळे लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी योगेश वर रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

याबाबत पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशाने पोलीस उप-अधीक्षक दौंड राहुल धस,रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करीत आहे.