‘न्यू इंडिया’मुळे राहुल गांधी ‘गोत्यात’, मुंबईत तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – योग दिवसाबाबत वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. योग दिवसापासुनच राहुल गांधी ट्रोल होत आहेत. आता त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबईतील वकिल अटल दुबे यांनी राहुल गांधींनी केलेल्या ट्विटवर आक्षेप घेवुन त्यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1142019983485988864

अटल दुबे यांनी जवानांना देखील राहुल गांधी यांच्याविरूध्द आर्मीचा अपमान केल्याप्रकरणी भादंवि कलम 505 (2) अन्वये तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांनी आर्मीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.

21 जून रोजी योगदिवस होता. त्या दिवशी राहुल गांधी यांनी काही फोटो ट्विटवर शेअर केले होते. त्यामध्ये एकीकडे जवान तर दुसरीकडे आर्मी डॉग योगा करीत असताना दिसत होते. त्या फोटोला राहुल गांधी यांनी ‘न्यू इंडिया’ असे कॅप्शन दिले होते. सोशल मिडीयावर राहुल गांधी यांना नेटकर्‍यांनी चांगलेच धारेवर धरले. राहुल गांधींच्या या कृतीबद्दल त्यांची प्रचंड निंदा देखील झाली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवर अद्यापही काॅंग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. सुत्रांच्या माहितीनूसार राहुल गांधी यांनी केलेले ट्विट हे काही काॅंग्रेस नेत्यांना देखील समजले नाही. मात्र, ‘न्यू इंडिया’ असे कॅप्शन देऊन राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना टेमना मारला होता. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राहुल गांधी यांच्या ट्विटची निंदा केली होती.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’