महिला तहसीलदाराबद्दल Facebook वर चुकीची पोस्ट टाकणार्‍याविरूध्द FIR दाखल

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर पंढरपुर महिला तहसीलदार यांची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या प्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १३ मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सागर चव्हाण यांनी १५ जुलै २०२० रोजी दहा वाजता फेसबुक वर कसलाही अधिकार प्राप्त नसताना तसेच कोणतीही खातर जमा न करता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, अशी तक्रार तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि कलम ५०५(१), १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर करत आहे.

दरम्यान, महिला तहसीलदार यांच्याविषयी चुकीचा गैरसमज पसरवणाऱ्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like