दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विनापरवाना स्टेजची उभारणी करुन दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या दहीहंडी उत्सव मंडळाच्या अध्याक्षाविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अध्यक्षासह स्टेज मालक, साऊंड मालकांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्य़ाद दिली आहे.
[amazon_link asins=’B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2b9ffbc9-b02a-11e8-823b-f5fe1c0477be’]

सोमवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. सहकारनगर येथील अरणेश्वर दहीहंडी उत्सव समितीचे अध्याक्षांनी उत्सव साजरा करताना कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नाही. परवानगी न घेता उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनीक रोडवर स्टेजची उभारणी केली. तसेच मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केले. रस्त्यावर स्टेज आणि साऊंड सिस्टीमची उभारणी करुन रोडवरील रहदारीस अडथळा निर्माण केला.
[amazon_link asins=’B06XMYM2PG,B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b0c6ac1-b02a-11e8-bda9-2f7d80fa2bae’]

पोलिसांकडून सुरु असलेला कार्यक्रम बंद करण्यास सांगितले असता मंडळाच्या अध्यक्षांनी याला नकार देऊन अनिल शेवाळे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.आर. पुराणीक करीत आहेत.

Please Subscribe Us On You Tube
Policenama News